विशेष वृतान्त

किशोर डुकरे यांचे कृषी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन

वरोरा प्रतिनिधी

वारंवार निवेदन देऊनही दखल प्रशासनाने न घेतल्याचा आरोप करीत शेतकरी नेते किशोर डुकरे

यांच्या नेतृत्त्वात ०५ ऑगस्ट रोज

सोमवारला तालुका कृषी कार्यालयासमोर

ठिय्या आंदोलन करण्यात आले व मागण्यांचे

निवेदन तहसीलदार यांच्या मार्फत

जिल्हाधिकारी चंद्रपूर, कृषी अधीक्षक चंद्रपुर

यांना देण्यात आली. यावेळी शासनाच्या

धोरणाविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

मागील वर्षी पंतप्रधान पीक विमा योजनेत

तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांनी भाग घेऊन

पीक विमा काढला मात्र त्या योजनेचा

शेतकऱ्यांना पुरेसा लाभ मिळाला नाही. हाती

आलेले सोयाबीन पीक रोगाने, तसेच रब्बी

मधील चणा, गहू या पिकाचे गारपीटमुळे

नुकसान झाले मात्र नुकसान भरपाई अजूनही

मिळाली नाही. तसेच मागील वर्षी पावसामुळे

कपाशी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान

झाले, याबाबत सबंधित तालुक्यातील

जवळपास नऊ ते दहा हजार शेतकऱ्यांनी

पिक विमा कंपनीकडे सोयाबीन आणि

कपाशीची एकाच दिवशी तक्रार केली

असून त्यादिवशी पाऊस नाही हे कारण

दाखवून कपाशीची तक्रार रिजेक्ट करण्यात

आली, पण त्याच दिवशी तक्रार, पंचनामा

झालेल्या काही शेतकऱ्यांना कापूस या

पिकाची पिक विमा रक्कम मिळाली आहे

हा दुजाभाव का आणि ज्या शेतकऱ्यांना

सोयाबीन या पिकाला १०० टक्के पीक

विमा लागू झाला अशा तालुक्यातील हजारो

शेतकऱ्यांना अजून पर्यंत काही रक्कम

मिळालेली नाही ती रक्कम येत्या आठ

दिवसात देण्यात यावी. अशा आशयाचे

निवेदन तहसीलदार यांच्या मार्फत

जिल्हाधिकारी चंद्रपूर, कृषी अधीक्षक यांना

देण्यात आले त्यानंतर तालुका कृषी

कार्यालय गाठत किशोर डुकरे यांच्या

नेतृत्वात शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केले

या आंदोलनादरम्यान राजकारण जोरात,

बळीराजा संकटात ! शेतकऱ्यांचा वाली कोण

१अशी चर्चा शेतकरी आपसात करीत

होते तर शासनाच्या उदासीन धोरणाबाबत

शासनाच्या व प्रशासनाच्या विरोधात

घोषणाबाजी करण्यात आली यावेळी, यांच्यासह तालुक्यातील

शेकडो शेतकऱ्यांची उपस्थिती होती.

शेअर करा.

मुख्य संपादक

टाइम्स 24 न्युज् हे एक सोशल मीडिया असून इथे बातम्या आणी चालू घडामोडी प्रतिनिधी कडून माहिती घेऊनच च्यानलं मध्ये प्रसारीत् केली जातात .जाहीरत् व बातमी साठी संपर्क.8830965218 मुख्य संपादक .राजेंद्र मेश्राम उप मुख्य संपादक.आशिष नागदेव

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!