विशेष वृतान्त

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्म सोहळ्या निमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

कालू रामपुरे वरोरा शहर प्रतिनिधी

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्म सोहळ्या निमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.

पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त आज दिनांक 15 ऑगस्ट 2024 या स्वातंत्र्य दिनी *पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृती समिती नागपूर

, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महीला मंडळ आणि महात्मे आय बँक अँड महात्मे हॉस्पिटल राजीव नगर सोमलवाडा नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते

या रक्तदान शिबिरामध्ये एम्स हॉस्पिटल नागपूरच्या डॉ.सौम्या दास , डॉ.रौनक , पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर समीतिचे पदाधिकारी डॉ.सुनीता महात्मे , मधुकरराव काळमेघ, महादेवराव पातोंड डॉ विनोद बरडे, वंदना विनोद बरडे यांनी रक्तदान शिबीराचे लालफित कापुन व अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून उद्घाटन करण्यात आले.सर्व दान दात्यांचे हिमोग्लोबिन तपासणी करून व बिपि ची तपासणी करून व कौन्सिलींग करून रक्त दान शिबिर घेण्यात आले. सर्व दात्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.एम्सच्या टिमने रक्त दान करणाऱ्या दानदात्या कडून रक्त संकलन केले *या शिबिरामध्ये खालील दानदात्यांनी रक्तदान श्रेष्ठ दान या उक्ती प्रमाणे आपले अमूल्य असे रक्त दान केले

डॉ.विनोद बरडे, चिराग बरडे, अभिजित लांडे, अविनाश भागवत, अमित बरडे, अतुल वानखेडे, दिनेश पाल, गणेश पाल, राजेंद्र सातपुते, विनोद अवझे, किशोर मुराळ, सुहास हुलवाने, रणजित सुलताने, रामेश्वर सोनाग्रे, तुषार घायवट, बालकदास नगराळे, राकेश पाटील, ईश्वर मोरे, यशवंत कातरे,आशिष लांडे, प्रज्वल रामटेके, निलेश थोटे, यश नंदनवार, अभय मांगे,निलेश थोटे,अंकुश वरखडे इत्यादी असे एकूण 32 व्यक्तींनी रक्तदान केले आहे*.सदर संकलित केलेले रक्त हे एम्स हॉस्पिटल येथील रक्त पेढी मध्ये ठेवण्यात येईल व आवश्यकतेनुसार तेथील पेशंट करिता वापरण्यात येईल.

*सदर रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मूती समिती,चे अध्यक्ष श्री.मधुकर काळमेघ, सचिव महादेव पातोंड व वंदना विनोद बरडे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महीला मंडळ अध्यक्ष,समिती सदस्य तुळशीराम आगरकर, विनोद बरडे,अनिल तांबडे, शरद उरकुडे,यशवंत कातरे, ईश्वर मोरे ,रामजी सोनाग्रे, अंकुश वरखडे, प्रशात निवांत, सौ. विद्या सोनाग्रे,सौ लक्ष्मी मोरे,सौ.जयश्री पातोंड इत्यादी नी प्रयत्न केले.

सदर शिबिरा करिता उपस्थित असलेले डॉक्टर्स व त्यांच्या सपोर्टिंग स्टॉपला तसेच ज्या ज्या सन्माननीय सदस्यांनी रक्तदान केले व शिबिराच्या आयोजनार्थ प्रयत्न केले त्या सर्वांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृती समिती तर्फे खूप खूप धन्यवाद देण्यात आले.आणी सर्वांना प्रमाणपत्र व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारांवर, आदर्शांवर, जीवनकार्यावर आधारित पुस्तक देवून सन्मानित करण्यात आले.

शेअर करा.

मुख्य संपादक

टाइम्स 24 न्युज् हे एक सोशल मीडिया असून इथे बातम्या आणी चालू घडामोडी प्रतिनिधी कडून माहिती घेऊनच च्यानलं मध्ये प्रसारीत् केली जातात .जाहीरत् व बातमी साठी संपर्क.8830965218 मुख्य संपादक .राजेंद्र मेश्राम उप मुख्य संपादक.आशिष नागदेव

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!