विशेष वृतान्त

रमाई महिला भजन मंडळ नागपूर जिल्ह्यात अव्वल:::

नागपूर प्रतिनिधी

रमाई महिला भजन मंडळ नागपूर जिल्ह्यात अव्वल:::

१) २० वर्षापासून भजनाद्वारे जनजागृतीचे कार्यक्रम ::

नागपूर प्रतिनिधी

नरखेड तालुक्यातील मोवाड येथील रमाई महिला भजन मंडळ २० वर्षापासून अंधश्रद्धा, जुन्या रुढी, परंपराचे भजन गायन करून तसेच भिमगीत, गोंधळी, अशा अनेक भजनाद्वारे नागरिकात जनजागृतीचे धाडसी कार्यक्रम घेऊन कीर्ती प्राप्त केली आहे. नागपूर जिल्हात तसेच इतर गावात जाऊन बुद्धविहार, मंदिरात, सामाजिक ठिकाणी, सार्वजनिक कार्यक्रमात, भजन गायन करून कार्यक्रम घेत समाज जागृतीचे कार्य रमाई महिला भजन मंडळ मोवाड या नोंदणीकृत मंडळने केले असून भजनाद्वारे सामाजिक चळवळीतील जनजागृतीचे कार्यक्रम घेतले आहे. नागपूर जिल्ह्यात वाडेगाव,खंडाळा, मोर्शी, मोवाड, टोयापार, खेडी, शिंदेवानी, आमला, पारडसिंगा, बेलोना ,सावरगाव ,गंगालडोह, बनगाव, सातनूर, थडीपवणी, गनेशपुर, एकदरा, पुसला, सोनोली, नरखेड, कळमेश्वर , नागपूर, अशा अनेक ठिकाणी रमाई महिला भजन मंडळाने भजनाद्वारे कार्यक्रम घेतले. या रमाई महिला भजन मंडळाचे अध्यक्षा सौ भिंमकला यशवंतराव बागडे , उपाध्यक्षा मंदाबाई नामदेवराव बागडे, सचिव सीमा पुरुषोत्तम बागडे, सहसचिव प्रमिला दिलीप बनसोड, सदस्य शुभांगी राजेंद्र बागडे, देवकाबाई अण्णाजी बागडे, कुसुम भिमराव कठाने,राजेंद्र विठ्ठलराव बागडे , यांचा संच असून यांनी या मंडळांनी २० वर्षापासून नागपूर जिल्ह्यातील शहर व गाव खेड्यामध्ये अंधश्रद्धे विषयी भजन गायन करून समाज जनजागृतीचे कार्यक्रम घेतल्याने त्यांच्या कार्यक्रमाला आयोजकांनी अभिनंदन केले आहे. तर सामाजिक चळवळीतील मान्यवरांनी त्यांचा आदर व सत्कार केला आहे.

शेअर करा.

मुख्य संपादक

टाइम्स 24 न्युज् हे एक सोशल मीडिया असून इथे बातम्या आणी चालू घडामोडी प्रतिनिधी कडून माहिती घेऊनच च्यानलं मध्ये प्रसारीत् केली जातात .जाहीरत् व बातमी साठी संपर्क.8830965218 मुख्य संपादक .राजेंद्र मेश्राम उप मुख्य संपादक.आशिष नागदेव

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!