विशेष वृतान्त

घरा घरात शिवाजी महाराज जन्माला आले पाहिजे : शिवव्याख्याते स्वप्निल पाटील यांचे प्रतिपादन

वैभव पाटील : सहसंपादक

आल महाराष्ट्र खुली भरती.मुला मुलींना.जॉब ची सुवर्ण संधी

श्री गणेश गणेश सेवा मंडळ लालठाणे( पाटील पाडा) रजि. न. पालघर /oooo 483/ 2024 या वर्षी सुवर्णं महोत्सवी वर्ष साजरे करत असताना दि. 7 सप्टेंबर ते 12 सप्टेंबर पर्यंत विविध सांस्कृतिक व प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित केले आहेत.त्यानिमित्ताने दिनांक 9 सप्टेंबर रोजी गावातील संपूर्ण माहेरवासिनींचा हळदी कुंकू कार्यक्रम व महाभंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी शिवव्याख्याते स्वप्निल पाटील यांचे प्रबोधनात्मक शिवव्याख्यान सुद्धा आयोजिक केले होते.शिवव्याख्याते स्वप्नील पाटील यांनी अतिशय सुंदर शब्दांमध्ये आधुनिक युगातील समाज जीवनावर प्रकाश टाकत असताना आज समाजामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराची खरी गरज आहे. त्यामुळे प्रत्येक घरात शिवाजी महाराज जन्माला आले पाहिजे असे प्रतिपादन त्यांनी केले. यावेळी श्री गणेश सेवा मंडळाचे सुद्धा त्याने कौतुक केलं हे मंडळ ज्या हेतूने स्थापन केला आहे तो हेतू याठिकाणी सार्थक होताना दिसत आहे. या वेळी बोईसर विधानसभेचे माजी आमदार विलासजी तरे यांनी मंडळाला भेट देऊन मंडळाचे अध्यक्ष जतिन पाटील ,सेक्रेटरी सुदर्शन पाटील व संपूर्ण कार्यकारी मंडळाचे कौतुक करून शुभेच्छा प्रदान केल्या तर कविवर्य तुषार ठाकरे यांनी आपल्या पहाडी आवाजामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांवर लिहिलेली कविता सादर केली. या शुभ समई पाहुणे मंडळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा.

मुख्य संपादक

टाइम्स 24 न्युज् हे एक सोशल मीडिया असून इथे बातम्या आणी चालू घडामोडी प्रतिनिधी कडून माहिती घेऊनच च्यानलं मध्ये प्रसारीत् केली जातात .जाहीरत् व बातमी साठी संपर्क.8830965218 मुख्य संपादक .राजेंद्र मेश्राम उप मुख्य संपादक.आशिष नागदेव

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!