आपला जिल्हाविशेष वृतान्त

श्री. गणपती उत्सवा निमित्ताने सफाळे पो. ठाणे. यांच्या कडून गणेशभक्त सह आढावा बैठक संपन्न

वैभव पाटील -सहसंपादक

श्री. गणपती उत्सवा निमित्ताने सफाळे पो. ठाणे. यांच्या कडून गणेशभक्त सह आढावा बैठक संपन्न

२ सप्टेंबर

सफाळे ( वैभव पाटील ) दि. 07 सप्टेंबर पासून येत असलेल्या गौरीगणपती सणाच्या निमित्ताने कायदा / सुव्यवस्था / शांतता राखण्यासाठी आणि महाराष्ट्र पोलीस यांनी दिलेल्या निदर्शनुसार आपले धार्मिक उत्सव साजरे करण्यासाठी दिलेल्या नियमावलीची माहिती होण्यासाठी सफाळे पोलीस ठाणे. ता. जि. पालघर यांच्या कडून दिनांक 02 सप्टेंबर 2024 रोजी मा. बाळासाहेब पाटील – पोलीस अधीक्षक पालघर यांच्या निदर्शनानुसार सफाळे पोलीस ठाणे हद्दीत येणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ अधिकारी, पदाधिकारी , घरगुती गौरी- गणपती उत्सव, साजरे करणारे नागरिक, गणेशभक्त यांना मार्गदर्शन करण्यासाठी व विभागातील गणेशोत्सव मंडळ यांची माहिती अवगत करण्यासाठी देवभूमी हॉल सफाळे पूर्व येथे मा.अभिजीत धाराशिवकर- पालघर विभागीय पोलीस अधिकारी, यांच्या मार्गदर्शनाखाली सफाळे पो. ठाणे प्रभारी पोलीस अधिकारी मा.दत्ता शेळके सपोनि यांनी मार्गदर्शन करण्याकरिता सभा आयोजित केली होती. यावेळी गणेशभक्त यांच्या सह म.रा.वि.मंडळ सफाळे विभाग अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि गणेश उत्सव साजरा करण्यामागिल कल्पना जगदीश किणी सर यांनी सर्वाना करून दिली.

सदर मिटींग मध्ये विभागीय पो. अधिकारी धाराशिवकर साहेब, आणि सफाळे पो. ठाणे मा. दत्ता शेळके सपोनि यांनी गणेशोत्सव मंडळ अधिकारी, आणि गणेशभक्त यांना मार्गदर्शन करताना सांगितले की कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस विभागाकडून नियमावली तयार करण्यात आली आहे.1) गणेश मंडळांनी गणपती स्थापने पूर्वी पोलीस ठाणे परवानगी घेणे बंधनकारक आहे. 2) वर्गणी सक्तीने जमा करू नये. 3) गणपती मंडप सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार बांधावा. 4) मंडप व गणपती स्थापनेचे आसन मजबूत असावे. 5) श्री. च्या मूर्तीची पाऊस व आगी पासून संरक्षणाची काळजी घ्यावी. 6) रोषणाई व लायटिंग विद्युतीकरण परवाना धारक वायरमन कडून करावे. 7) उत्सवात आणि मिरवणूकीत देखावे, कोणत्याही धर्माच्या भावना दुखावल्या जातील असे नसावेत. 8) श्रींची मुर्ती / रोषणाई / सजावट देखभालीसाठी मंडळाचे कार्यकर्ते / स्वयंसेवक नेमावे. ९) दर्शनासाठी मंडपात येणाऱ्या भाविकांची व विसर्जन मिरवणुकीत महिलांची काळजी घेण्यात यावी त्यामुळे होणारे अतिप्रसंग टळतील. 10) सांस्कृतिक कार्यक्रम सादर करताना वेळेचे बंधन पाळणे गरजेचे आहे. 11) वाद्य वाजविताना आवाजाचे नियम पाळणे गरजेचे आहे. 12) विसर्जन मिरवणुकीत आणि रात्री मंडपात नियमावली पाळणे आवश्यक आहे. आदि सुचना गणेश भक्तांना व्यासपीठावरील पोलीस अधिकारी यांनी दिल्या.

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ सफाळे विभाग अधिकारी यांनी मंडपात लाईट लावण्यासाठी आणि रोषणाई करण्यासाठी नविन लाईक कनेक्शन उपलब्ध करून देण्यात येतील. अधिकृतपणे लाईट घ्यावी. आमचे सहकार्य सर्वाना असेल.कृपया कोणाच्या घरातून विद्युत पुरवठा घेऊ नका.अशा अनेक मार्गदर्शक सूचना यावेळी करण्यात आल्या.सदर सभी करिता परिसरातील सरपंच उपसरपंच गणेश मंडळाचे अध्यक्ष पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा.

मुख्य संपादक

टाइम्स 24 न्युज् हे एक सोशल मीडिया असून इथे बातम्या आणी चालू घडामोडी प्रतिनिधी कडून माहिती घेऊनच च्यानलं मध्ये प्रसारीत् केली जातात .जाहीरत् व बातमी साठी संपर्क.8830965218 मुख्य संपादक .राजेंद्र मेश्राम उप मुख्य संपादक.आशिष नागदेव

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!