विशेष वृतान्त

जिजामाता क्रीडा मंडळाच्या वतीने यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार

जालना प्रतिनिधी

अंबड (वार्ताहर ) येथून जवळच असलेल्या जिजामाता क्रीडा मंडळ किनगाव च्या विद्यार्थ्यांनी सन 2024 या वर्षामध्ये वेगवेगळ्या शासकीय सेवेला गवसणी घातली.

स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून जिजामाता क्रीडा मंडळाने यशस्वी खेळाडू विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात केले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी किनगाव नगरीचे सरपंच प्रदीप भोजने,विशेष अतिथी म्हणून गोदावरी महाविद्यालय अंबड येथील प्रसिद्ध अर्थतज्ञ तथा बामुक्टो संघटनेचे विभागीय सरचिटणीस प्रा.डॉ मारुती तेगमपुरे हे होते.

उपस्थित सर्व मान्यवरांचा यथोचित सन्मान क्रीडा मंडळाच्या खेळाडूंकडून करण्यात आला

यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये सध्या जालना पोलीस दलामध्ये कार्यरत राष्ट्रीय खेळाडू सुरेखा सुखदेव भोजने (गायकवाड )हिची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या माध्यमातून पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाली तर बाळू हरिचंद्र भोजने छत्रपती संभाजी नगर पोलीस, आकाश बबन वाघ चंद्रपूर पोलीस, प्रिया प्रल्हाद चुंगडे मुंबई पोलीस,राजू मेवाड पिंपरी चिंचवड,राष्ट्रीय कबड्डी खेळाडू रोहित बिनीवाले जालना राज्य राखीव पोलीस,वंदना अंकुश फाटे महावितरण अंबड, राठोड जळगाव पोलीस.प्रदीप काळवणे पुणे पोलीस,अक्षय येळवंते तलाठी जालना येथे निवड झाली या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार मंडळाच्या वतीने प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते क्रीडांगणावर करण्यात आला याप्रसंगी सत्काराला उत्तर देतांना पोलीस उपनिरीक्षक म्हणून निवड झालेल्या सुरेखा भोजने (गायकवाड) हिने आपल्या मनोगतामध्ये सांगितले की माझ्या यशामध्ये माझे आई वडील,पती शंकर गायकवाड,क्रीडा शिक्षक संजय येळवंते आणि जिजामाता माध्यमिक विद्यालयाच्या शिक्षकांचा मोठा वाटा आहे. विद्यार्थ्यांनी जोपर्यंत आपलं ध्येय पूर्ण होत नाही तोपर्यंत व्हाट्सअप, फेसबुक,इंस्टाग्राम सारख्या सोशल मीडिया पासून दूर राहिलं पाहीजे. खेळामुळे यश अपयश पचवण्याची शक्ती निर्माण होते. त्यामुळे जोपर्यंत आपण यश मिळवत नाही तोपर्यंत हार मानू नये. मी चार परीक्षेमध्ये अपयशी झाले परंतु हार मानली नाही.

उपस्थित सर्व विद्यार्थी खेळाडू पालक यांना मार्गदर्शन करतांना विशेष प्रमुख अतिथी प्रा.डॉ मारुती तेगमपुरे यांनी सांगितले की खेळामुळे मन मनगट आणि मस्तक सशक्त होत असते त्यामुळे सशक्त झालेलं मस्तक कुणापुढेही नतमस्तक होत नसते.खेळामुळे जिद्द चिकाटी व संघर्ष करण्याची प्रेरणा मिळते. यासाठी विद्यार्थ्यांनी खेळ आणि शिक्षण या दोन्हींचा समन्वय साधून जीवनामध्ये यशस्वी झालं पाहीजे. हे विद्यार्थ्यांकडे पाहून लक्षात येते.

याप्रसंगी किनगाव चे माजी सरपंच केदारनाथ वाघ, शिवाजी बिन्नी वाले राष्ट्रीय खेळाडू , देविदास भोजने (जालना पोलीस), राष्ट्रीय खेळाडू गणेश वाघ,ननवरे अशोक बोंबले, राष्ट्रीय खेळाडू शिवाजी पिवळ, ( शिक्षक) पोलीस दलामध्ये कार्यरत असलेली मेघा नागलोत, छत्रपती संभाजी नगर येथे वकील म्हणून काम करत असलेली राष्ट्रीय खेळाडू चांगुना नांगलोत, आणि तिचे पती वकील राजपूत साहेब, उज्वला घुले सहाय्यक व्यवस्थापक एचडीएफसी बँक छत्रपती संभाजी नगर,कृष्णा वाघ, सकाळचे पत्रकार वसंत काळवणे, पोपटराव घुले, भानुदास नन्नवरे, प्रल्हाद चूंगडे हे उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय येळवंते यांनी तर सूत्रसंचालन अजय काळवणे व आभार जिजामाता क्रीडा मंडळाचे अध्यक्ष दिनेश वाघ यांनी मानले.राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली .

शेअर करा.

मुख्य संपादक

टाइम्स 24 न्युज् हे एक सोशल मीडिया असून इथे बातम्या आणी चालू घडामोडी प्रतिनिधी कडून माहिती घेऊनच च्यानलं मध्ये प्रसारीत् केली जातात .जाहीरत् व बातमी साठी संपर्क.8830965218 मुख्य संपादक .राजेंद्र मेश्राम उप मुख्य संपादक.आशिष नागदेव

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!