विशेष वृतान्त

माध्यमिक शासकीय आश्रमशाळा लालठाणेतील विद्यार्थ्यांना विषबाधा

वैभव पाटील : सहसंपादक 

पालघर तालुक्यातील माध्यमिक शासकीय आश्रमशाळा लालठाणे येथे एकूण इयत्ता पाचवी ते दहावी पर्यंत परिसरातील 244 विद्यार्थी शिक्षण घेत असून दि. 5 ऑगस्ट रोजी रात्री दुधीची भाजी खाल्ल्याने शाळेतील 12 विद्यार्थ्यांना विषबाधा झाली असून सदर विद्यार्थ्यांना प्राथमिक आरोग्य केंद्र सफाळे येथे दाखल केले केले असून त्यांच्यावर उपचार सुरू केले आहेत.एकंदरीत सर्व विद्यार्थ्यांचे प्रकृती ठीक आहे.रात्रीच्या वेळेला विद्यार्थ्यांना दिलेले अन्न डाळ भात रोटी व दुधीची भाजी त्यामुळे विषबाधा झाली असावी असा प्रथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे.रात्रीची भाजी कडू लागत होती अशी माहिती शाळेतील विद्यार्थी ऋत्विक डावरे यांनी दिली.या विद्यार्थ्यांना दिले जाणारे जेवण मध्यवर्ती स्वयंपाक गृह कांबळगाव येथे तयार केले जाते व तेथूनच आश्रम शाळांपर्यंत विद्यार्थ्यांकरीता पोहोचवले जाते.अनेक विद्यार्थ्यांना रात्रीचे जेवण आवडत नसल्याची माहिती शाळेतील विद्यार्थ्यांकडून मिळत आहे. शाळेचे मुख्याध्यापक रजेवर असल्यामुळे जास्त माहिती मिळू शकली नाही.परंतु शाळेचे अधीक्षक देसाई सर त्यांच्याकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता 12 विद्यार्थ्यांना विषबाधा झाली असण्याचं त्याने माहिती दिली.सर्व विद्यार्थ्यांना लागलीच ॲम्बुलन्सने सफाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये औषध उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.यावेळी लालठाणे गावचे पोलीस पाटील संदेश पाटील , उपसरपंच जुई पाटील, सामाजिक कार्यकर्ते जतीन पाटील, माजी उपसरपंच राकेश पाटील व ग्रामस्थ विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी शाळेत उपस्थित होते.

शेअर करा.

मुख्य संपादक

टाइम्स 24 न्युज् हे एक सोशल मीडिया असून इथे बातम्या आणी चालू घडामोडी प्रतिनिधी कडून माहिती घेऊनच च्यानलं मध्ये प्रसारीत् केली जातात .जाहीरत् व बातमी साठी संपर्क.8830965218 मुख्य संपादक .राजेंद्र मेश्राम उप मुख्य संपादक.आशिष नागदेव

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!