आपला जिल्हा

शेतकऱ्यांना तत्काळ पिककर्ज द्यावे व शेतकऱ्यांचे खाते होल्ड काढावे – संतोष खारवणे

डॉ आशिष तिवारी

मंठा – वाटुर येथील स्टेट बॅक ॲाफ इंडिया शाखेला युवासेनेच्या वतीने संतोष खारवणे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले. शेतकऱ्यांना तत्काळ पिककर्ज देण्यात यावे व शेतकऱ्यांचे खाते होल्ड काढणे याबाबत निवेदन देण्यात आले. शेतकऱ्यांना पेरणीसाठी पैसे नसल्यामुळे काही शेतकऱ्यांनी पेरणी केली नाही. तर, काही शेतकऱ्यांनी पेरणीसाठी खाजगी कर्ज काढुन पेरणी केलेली आहे. शेतकऱ्यांना नेहमी संकटाचा सामना करावा लागतो. कधी ओला दुष्काळ तर, कधी कोरडा दुष्काळ. कधी ना पिक तर, कधी आवकाळी पाऊस. तसेच शेतकऱ्यांच्या शेतमाला योग्य भाव मिळत नाही. अशा अनेक संकटाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे.

तेव्हा आपण लवकरात लवकर शेतकऱ्यांना पिककर्ज वाटप करावे व शेतकऱ्यांचे खाते होल्ड काढावे. नसता, आपल्या शाखेसमोर युवा सेना शिवसेना स्टाईलने शिवसेना जिल्हाप्रमुख ए.जे.पाटील बोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.

यावेळी संतोष खारवणे, राजु शिंदे, गजानन सोनवणे, राजु जाधव, महादेव शिंदे, केशव खारवणे, शेषराव चव्हाण, रामेश्वर निमट, रामभाऊ पळसे, अमोल खारवणे, देविदास राठोड, राजेश खारवणे, अमोल जाधव, देविदास राठोड आदींची उपस्थीती होती..

शेअर करा.

मुख्य संपादक

टाइम्स 24 न्युज् हे एक सोशल मीडिया असून इथे बातम्या आणी चालू घडामोडी प्रतिनिधी कडून माहिती घेऊनच च्यानलं मध्ये प्रसारीत् केली जातात .जाहीरत् व बातमी साठी संपर्क.8830965218 मुख्य संपादक .राजेंद्र मेश्राम उप मुख्य संपादक.आशिष नागदेव

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!