आपला जिल्हा

केळवा रोड येथे धारदार शस्त्राने एका महिलेचा खून!

वैभव पाटील:

संशयित आरोपीला पोलीसांनी केली अटक

 

७ जुलै सफाळे दिनांक ४ जुलै २०२४ रोजी फिर्यादी सुमितकुमार अशोककुमार सिंग वय वर्षे ३८ रा. उमरोळी ता. जि. पालघर यांने, सफाळे पोलीस ठाणे ता. जि. पालघर येथे फिर्याद दिली असून सिध्दीविनायक चाळ, साईपुजा केळवा रोड ता. जि. पालघर याठिकाणी दिनांक ३ जुलै २०२४ रोजी संध्याकाळी अंदाजे ७ – १३ वाजता सुमन बुद्धीराम कनोजिया हिचा कोणीतरी अज्ञात आरोपीने कोणत्यातरी धारदार हत्याराने गळा कापून खून केला.

या अनुषंगाने सफाळे पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नंबर ४३ / २०२४ बी. एन. एस. कलम १०३ ( १ ) गुन्हा दाखल करण्यात आला असून घटना स्थळास उपविभागीय पोलीस अधिकारी निता पाडवी यांनी तात्काळ भेट दिली असून तपास अधिकारी- सफाळे पो. ठाणे प्रभारी पोलीस अधिकारी दत्ता शेळके सहा. पो. निरीक्षण मार्गदर्शनाखाली प्राजक्ता पाटील- मपोउप निरीक्षक, पुढील तपास करीत आहे. संशयित आरोपी म्हणून बुद्धीराम गोरखनाथ कनोजिया वय वर्षे २७ यास ताब्यात घेतले आहे.

शेअर करा.

मुख्य संपादक

टाइम्स 24 न्युज् हे एक सोशल मीडिया असून इथे बातम्या आणी चालू घडामोडी प्रतिनिधी कडून माहिती घेऊनच च्यानलं मध्ये प्रसारीत् केली जातात .जाहीरत् व बातमी साठी संपर्क.8830965218 मुख्य संपादक .राजेंद्र मेश्राम उप मुख्य संपादक.आशिष नागदेव

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!