आपला जिल्हा

बल्लारपूर शहरातील घटना; गोळीबारात एक गंभीर जखमी

चंद्रपूर प्रतिनिधी

पेट्रोल बॉम्बचा स्फोट आणि गोळीबाराने बल्लारपूर हादरले

बल्लारपूर शहरातील घटना; गोळीबारात एक गंभीर जखमी

चंद्रपूर (बल्लारपूर) – मनसे कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष अमन अंधेवार यांच्यावरील गोळीबाराच्या घटनेनंतर आता बल्लारपूर शहरात कापड व्यावसायिक यश व अभिषेक मालू यांच्या कापड दुकानात पेट्रोल बॉम्ब फेकून स्फोट घडवून आणण्यात आला व नंतर गोळीबार केल्याने खळबळ उडाली आहे. या गोळीबारात मालू यांच्या दुकानात काम करणाऱ्या कार्तिक साखरकर नावाच्या नोकरांच्या पायाला गोळी लागल्याने गंभीर जखमी झाला आहे. दरम्यान या पेट्रोल बॉम्ब स्फोट व गोळीबाराचा व्यापारी संघटनेने तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे.

 

बल्लारपूर बस्ती वॉर्डात यश व अभिषेक मालू यांचे शॉपिंग मॉल आहे. रविवारी सकाळी दुकान उघडण्यासाठी मालू यांनी नोकर कार्तिक व महेंद्र यांना दुकानाची चाबी दिली. त्यानंतर दोन्ही नोकरांनी दुकान उघडले. दरम्यान यावेळी हल्लेखोर दुकान जवळ यश व अभिषेक मालू यांची वाटच बघत बसले होते. दोन्ही नोकरांनी दुकान उघडले तेव्हा हल्लेखोरांना वाटले हेच दोघे यश व अभिषेक मालू आहेत. त्यामुळे दुकानाच्या आत पेट्रोल बॉम्ब टाकला व गोळीबार केला. यातील एक गोळी नोकर कार्तिक याच्या पायाला लागली. यानंतर हल्लेखोर पळून गेले. दरम्यान गोळीबारचा आवाज ऐकताच सर्वजण सैरावैरा पाळायला लागले. या गोळीबार मध्ये मालू यांच्या दुकानात काम करणाऱ्या कार्तिक साखरकर नावाच्या कर्मचाऱ्यास पायाला गोळी लागल्याने गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल केले.

 

या घटनेची माहिती मिळताच बल्लारपूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या परिसरातील सी.सी. टिव्ही कॅमेरे तपासून चौकशी केली जात आहे. दरम्यान सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मालू यांच्या शेजारी तंबाखू व क्रिकेट ऑनलाईन सट्टा व्यवसाय करणाऱ्या संजय गुप्ता यांचे घर आहे. मालू व गुप्ता यांच्यात भांडण आहे. याच भांडणातून गुप्ता यांनी एक वर्षापूर्वी मालू यांचे दुकान जाळले होते. तेव्हापासून गुप्ता फरार आहे. त्याला न्यायालयातून अटकपूर्व जमीन देखील नाकारण्यात आला आहे. मागील काही दिवसांपासून मालू यांना जीवे मारण्याच्या धमक्या येत होत्या. मालू यांच्या घरी विवाह समारंभ असल्याने कार्यक्रम सुरू आहेत. मात्र गेल्या काही दिवसात धमक्या वाढल्या असल्याने मालू यांनी चार दिवसांपूर्वी पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांची भेट घेऊन हा घटनाक्रम सांगितला व तशी तक्रार देखील केली आहे. दरम्यान तक्रारीनंतर चार दिवसांनी गोळीबार झाल्याने मालू कुटुंबीय भयभीत झाले आहे. बल्लारपूर पोलीस आरोपीचा शोध घेत आहे.

शेअर करा.

मुख्य संपादक

टाइम्स 24 न्युज् हे एक सोशल मीडिया असून इथे बातम्या आणी चालू घडामोडी प्रतिनिधी कडून माहिती घेऊनच च्यानलं मध्ये प्रसारीत् केली जातात .जाहीरत् व बातमी साठी संपर्क.8830965218 मुख्य संपादक .राजेंद्र मेश्राम उप मुख्य संपादक.आशिष नागदेव

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!