आपला जिल्हा

चंद्रपुरात गोळीबार मनसे कामगार सेनेचा जिल्हाप्रमुख जखमी

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

आरोपी शोध सुरू ; रघुवंशी कॉम्प्लेक्स मधील घटना

चंद्रपूर – शहरातील गजबजलेल्या रघुवंशी कॉम्प्लेक्समध्ये गोळीबार करण्यात आल्याची धक्कादायक घटना गुरुवारी दुपारी 2 वाजताच्या सुमारास घडली. याचा सीसीटीव्ही समोर आला आहे. या गोळीबारात अमन अंधेवार नामक युवक जखमी झाला. त्यांना प्राथमिक उपचारानंतर नागपूर येथे हलविण्यात आले आहे.

 

अमन हा महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचा जिल्हाप्रमुख असल्याची माहिती समोर येत असून याच संकुलात त्याचे कार्यालय आहे. जुन्या वैमनस्यातून त्याच्यावर गोळीबार करण्यात आल्याची माहिती आहे. वर्षभरापूर्वी याच ठिकाणी याच आरोपीने अमनच्या लहान भावावर गोळीबार करून पळ काढला होता. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेले रघुवंशी कॉम्प्लेक्स हे व्यावसायिक संकुल असून हा परिसर लोकांनी गजबजलेला असतो. त्यामुळे इथे गोळीबार झाल्याने पोलिसही चक्रावले आहेत. घटनेची लागलीच दखल घेत पोलीस अधीक्षक सुदर्शन मुम्मका घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरू करण्यात आला आहे.

शेअर करा.

मुख्य संपादक

टाइम्स 24 न्युज् हे एक सोशल मीडिया असून इथे बातम्या आणी चालू घडामोडी प्रतिनिधी कडून माहिती घेऊनच च्यानलं मध्ये प्रसारीत् केली जातात .जाहीरत् व बातमी साठी संपर्क.8830965218 मुख्य संपादक .राजेंद्र मेश्राम उप मुख्य संपादक.आशिष नागदेव

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!