विशेष वृतान्त

आनंदवनात बसचे लोकार्पण

कालू रामपुरे

आनंदवनात बसचे लोकार्पण

भारतीय जीवन विमा निगम द्वारा आनंद वनातील रुग्णांना वाहतुकीसाठी आनंदवनासाठी वीस सीटर बसचे लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी महारोगी सेवा समितीचे सचिव डॉक्टर विकास आमटे भारतीय जीवन विमा निगमचे क्षेत्रीय प्रबंधक सनोज कुमार ,प्रादेशिक प्रबंधक एन एस राघवा वरिष्ठ मंडळ प्रबंधक मलिक ,विपणन प्रबंधक अजय शुक्ला, दीपेश कटारिया समाजसेविका पल्लवी आमटे यांची उपस्थिती होती.यावेळी बोलताना सनोज कुमार यांनी आनंदवनातील निस्वार्थ व निस्पृह सेवेचे कौतुक करतानाच समाजातील सर्वांनी या क पुण्यकार्याला हातभार लावणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन केले तसेच जीवन विमा निगम कडून शक्य त्या मदतीचे आश्वासन दिले. डॉक्टर विकास आमटे यांनी आनंदवनाच्या वतीने आभार व्यक्त करताना सर्वांच्या सहकार्यानेच समाजातील कुष्ठ रुग्ण, दिव्यांग बांधवांची सेवा करणे शक्य असल्याचे सांगितले. तसेच आनंदवनाचे कार्य पाहण्यासाठी सर्वांनी आनंदवनला भेट देऊन येथील बांधवांच्या सुखदुःखात सहभागी होण्याचे आवाहन केले.कार्यक्रमाचे संचालन हेमंत कुलकर्णी व आभार प्रदर्शन शाखा प्रबंधक मोहन गोगुलवार यांनी केले यशस्वीतेसाठी देवेंद्र वरखेडकर ,विशाल नांदुरकर ,सुनील विझवे सचिन बोमकंटीवार व वरोरा शाखेच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

शेअर करा.

मुख्य संपादक

टाइम्स 24 न्युज् हे एक सोशल मीडिया असून इथे बातम्या आणी चालू घडामोडी प्रतिनिधी कडून माहिती घेऊनच च्यानलं मध्ये प्रसारीत् केली जातात .जाहीरत् व बातमी साठी संपर्क.8830965218 मुख्य संपादक .राजेंद्र मेश्राम उप मुख्य संपादक.आशिष नागदेव

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!