विशेष वृतान्त

ऊप जिल्हा रूग्णालय वरोरा जिल्हा चंद्रपूर येथे जागतिक स्तनपान सप्ताहाचा दुसरा दिवस सुद्रुढ बालकं स्पर्धेने साजरा.

कालू रामपुरे

जागतिक स्तनपान सप्ताह निमित्याने वेगवेगळ्या स्पर्धा व थीम वापरुन साजरा करायचा आहे.तेच औचित्य साधून उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे शुक्रवारी लहान बाळांच्या लसीकरणाचा दिवस त्यामध्ये सुद्रुढ बालकं स्पर्धा ठेवण्यात आली.या कार्यक्रमासाठी व्यासपीठवर डॉ प्रविण केशवानी दंत चिकित्सक, वंदना विनोद बरडे अधीसेवीका, गीतांजली ढोक आहारतज्ञ,रुबीना खान,अप.स्वाती जुनारकर एन.एम.शिष्टर होतें.सर्व मान्यवर यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.डाॅ केशवानी यांनी लहान मुलांमध्ये दात किडण्याच प्रमाण जास्त असल्याचे सांगितले आणि त्यांवर काय उपाययोजना करायची याबद्दल माहिती दिली.वंदना बरडे अधीसेवीका यांनी दुधाचे महत्व समजावून सांगितले ते कोणत्याही वेळी, कधींही उपलब्ध असतें.त्यासाठी पैसा खर्च करावा लागत नाही.सर्व गोष्टिने परी पुर्ण असतें.त्यामध्ये कुठलिही मीलावट राहतं नाही.आईचेच दुध असल्यामुळे खात्रीचे असते.योग्य तापमानाचे असतें.सर्व व्हिटामिन,मीनरल्स, प्रोटीन, कार्बोहाइड्रेट, शुध्द फाॅट, स्निग्ध पदार्थ, पाणी,योग्य प्रमाणात असतें.म्हणून पहीले ६महीने निव्वळ आईने दूधच पाजावे.नंतर अन्न प्राशन कार्यक्रम करून थोडेथोडे पातळ अन्न, नंतर घट्टसर,असे करून जेवणाला तयार करावे व सोबत ३ वर्षपर्यत स्तनपान चालूं ठेवावे.

गितांजलि ढोक आहारतज्ञ यांनी आहाराबाबत मार्गदर्शन केले.मिना मोगरे अप.यानी दुध पाजल्यानंतर काय काळजी घ्यायची याचे प्रात्यक्षिक करून दाखविले.वंदना बूर्रेवार आहार समुपदेशक यांनी समुपदेशन केले.रूबीना खान यांनी प्रास्ताविक केले व आभारप्रदर्शन स्वाती जुनारकर यांनी केले.कार्यक्रमासाठी वंदना विनोद बरडे अधीसेवीका,रुबिना खान अप., गीतांजली ढोक, वंदना बुर्रेवार, सरस्वती कापटे पसे., सुनंदा पुसनाके पसे.कूंदा मडावी, लक्ष्मीकांत ताले, जयश्री यांनी मेहनत घेतली.४० बालकांनी व पालकांनी कार्यक्रमांचा फायदा घेतला.त्यातील ३ मूल स्पर्धेमध्ये निवडले गेले. त्यांच वय,वजन, उंची, बाकी सर्व गोष्टी बघून निवड करण्यात आली.रुद्र प्रताप सिंग प्रथम क्रमांक, रोहीत आकाश लेगाडे दुसरा क्रमांक,अन्नन्या संदिप डाखोरे तिसरा क्रमांक देण्यात आला.त्यांना हिमालया तेल व पावडर प्रथम दोन क्रमांकाना बक्षीस देण्यात आले व तिसर्या क्रमांकाला पाम्पंर्रस पाकिट बक्षीस देण्यात आले.हे बक्षीस प्रथम क्रमांक रुद्रला डॉ केशवानी यांनी देवुन सत्कार व सन्मान करण्यात आला.दुसरे बक्षीस वंदना विनोद बरडे यांनी रोहीतला दिला.तिसरा क्रमांक च बक्षीस गितांजली ढोक यांनी दिले सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाला मदत केली व स्तनपान सप्ताहाचा दुसरा दिवस सुद्रुढ बालकं स्पर्धेने साजरा करण्यात आला व यशस्वी रित्या सर्वांच्या सहकार्याने पार पडला.

शेअर करा.

मुख्य संपादक

टाइम्स 24 न्युज् हे एक सोशल मीडिया असून इथे बातम्या आणी चालू घडामोडी प्रतिनिधी कडून माहिती घेऊनच च्यानलं मध्ये प्रसारीत् केली जातात .जाहीरत् व बातमी साठी संपर्क.8830965218 मुख्य संपादक .राजेंद्र मेश्राम उप मुख्य संपादक.आशिष नागदेव

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!