विशेष वृतान्त

संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन द्वारा विठ्ठलवाडी – जलसार परिसरात वृक्षारोपण…

वैभव पाटील :

‘ Oneness वन’ अभियानांतर्गत पालघर तालुक्यातील सफाळे पश्चिमेला असलेल्या परिसरात संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन आणि ग्रुप ग्रामपंचायत मांडे- विठ्ठलवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने ९ ऑगस्ट क्रांती दिन, जागतिक आदिवासी दिवस व नागपंचमी या तिहेरी विशेष शुभ दिवसाचे औचित्य साधून मांडे- विठ्ठलवाडी क्रिकेट मैदान, डोंगरी परिसरात व जलसार स्मशानभूमी परिसरात ५०० वृक्षाची लागवड करण्यात आली.

सकाळच्या सत्रात उदघाटक मा .कामनीष राऊत यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की वृक्षा प्रमाणेच निरंकारी मंडळ हे परोपकारी सेवाभावी कार्य करीत असून अनेक सामाजिक उपक्रमातून मानवाला जागृती प्रदान करीत आहे. प्रसंगी सरपंच महेंद्र पाटील, क्षत्रिय संचालक वासुदेव भोईर, मुखी महेंद्र गवळी, यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यावेळी परिसरातून असंख्य महिला, तरुण-तरुणी व संत निरंकारी मिशनचे अनुयायी अत्यंत उत्साहाने सहभागी झाले होते.

दुपारच्या सत्रात ग्रामपंचायत जलसार येथील स्मशानभूमी परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. या अभियानात कुणाल पाटील, निवृत्त फॉरेस्ट अधिकारी संदेश पाटील, जलसार सरपंच साक्षी गावड, उपसरपंच विंकोश म्हात्रे, धनेश गावड, सुभाष कदम, माजी सरपंच शरद घरत, सचिन पाटील, सुरज साळुंखे, संचालक वैभव गोरे, कुंदन राऊत, श्रीधर म्हात्रे तसेच परिसरातून संत निरंकारी मिशनचे जवळजवळ २०० अनुयायी सहभागी झाले होते. कार्यक्रम समाप्तीनंतर सर्वांनी प्रीती भोजनाचा आस्वाद घेतला.

शेअर करा.

मुख्य संपादक

टाइम्स 24 न्युज् हे एक सोशल मीडिया असून इथे बातम्या आणी चालू घडामोडी प्रतिनिधी कडून माहिती घेऊनच च्यानलं मध्ये प्रसारीत् केली जातात .जाहीरत् व बातमी साठी संपर्क.8830965218 मुख्य संपादक .राजेंद्र मेश्राम उप मुख्य संपादक.आशिष नागदेव

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!