क्राईम स्टोरी

मयत व्यक्तीच्या वारस शोध कामी

13 एप्रिल
सफाळे ( वैभव पाटील ) सफाळे पोलीस ठाणे हद्दीतील सरतोडी सफाळे पूर्व गावातील हद्दीत सफाळे – विरार कडे जाणाऱ्या रेल्वे रुळाच्या पश्चिमेस अंदाजे एक ते दीड किलोमीटर अंतरावर खारटन जमिनीत कुजलेल्या अवस्थेत दिनांक 2 एप्रिल 2024 रोजी पुरूष जातीचा मृत देह मिळून आलेला आहे. या अनुषंगाने सफाळे पोलीस ठाणे ता. जि. पालघर येथे अपघाती मृत्यू रजिस्टर क्रमांक 13 / 2024 सीआरपीसी 174 प्रमाणे नोंद करण्यात आली आहे.
मयताचे वर्णन खालील प्रमाणे.
मृत व्यक्तीचे नाव, गाव काही माहित नाही. वय अंदाजे – 40 ते 45 वर्षे, उंची 5 फुट 2 इंच, रंग- सावळा, बांधा- मजबूत, अंगात मळकट पांढऱ्या रंगाचा हाप बाहीचा टि शर्ट, लाल रंगाची अंडरवेअर, दोन्ही हात मनापासून दुमडलेला. दोन्ही पाय गुढघ्यापसुन वाकलेले, व उतान्या स्थितीत, कुलेला मृतदेह तिन- चार दिवसांपुर्वी मयत झाला असावा. असा मृतदेह मिळून आलेला आहे.
सदर व्यक्तीच्या किंवा वारसाच्या शेधकामी, कोणासही काही माहिती असल्यास किंवा मिळून आल्यावर खालील मोबाईल नंबर वर संपर्क करावा असे सफाळे पो. ठाणे ता. जि. पालघर कडून कळविण्यात येत आहे.
मो. न. 8999676298/8669604037

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!