विशेष वृतान्त

सफाळेत चोरट्यांचा धुमाकूळ

वैभव पाटील : प्रतिनिधी

अज्ञात चोरट्यांनी दोन दुकाने फोडली , 

 

चोर सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद

पालघर तालुक्यातील सफाळे परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ घातला असून मंगळवारी पहाटे दीड वाजल्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी दोन दुकाने फोडली असून एका दुकानाचे टाळे तोडण्यात अपयश आले आहे. एक चोर सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला आहे. सफाळे परिसरात आता पर्यंत तीन ते चार ठिकाणी चोरीच्या घटना घडल्या असून सतत चोरीमुळे भीतीचे वातावरण पसरले आहे.

सफाळे बाजारपेठेतील रिद्धी सिद्धी कपड्यांच्या दुकानात व अंकुर कृषी सेवा केंद्र असलेल्या दुकानातील टाळे तोडुन चोरी केली आहे. रिद्धी सिद्धी कपड्यांच्या दुकानात हातात काही लागले नसुन चोरीचा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद झाला आहे. त्याचप्रमाणें अंकुर कृषी सेवा केंद्राच्या दुकानाचे टाळे तोडण्यात आली असून पाच हजारांची रक्कम लंपास केले असल्याचे दुकान मालकांनी सांगितले.दोन्ही चो-या मंगळवारी पहाटेच्या सुमारास झाल्या आहेत. त्याचबरोबर नावझे येथील महिलेला लुटण्याचा प्रकार घडला होता. आठवडाभरात नवघर साईबाबा मंदिरात दानपेटीची चोरी झाली होती तर सफाळे येथील बंद घरातील सामान चोरट्यांनी लंपास केले होते. त्यामुळे चोरीच्या घटनेत वाढ होत असून परिसरात भिती निर्माण झाले आहे.

शेअर करा.

मुख्य संपादक

टाइम्स 24 न्युज् हे एक सोशल मीडिया असून इथे बातम्या आणी चालू घडामोडी प्रतिनिधी कडून माहिती घेऊनच च्यानलं मध्ये प्रसारीत् केली जातात .जाहीरत् व बातमी साठी संपर्क.8830965218 मुख्य संपादक .राजेंद्र मेश्राम उप मुख्य संपादक.आशिष नागदेव

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!