विशेष वृतान्त

१५ ऑगस्ट स्वतंत्र दिवसा निमित्त केळवा सा. पो. ठाणे द्वारे रक्तदान शिबीर संपन्न

वैभव पाटील

१६ ऑगस्ट : भारतीय स्वतंत्र्याच्या ७८ व्या स्वतंत्र दिवसाच्या निमित्ताने, आणि मा.बाळासाहेब पाटील

पोलीस अधीक्षक पालघर यांच्या संकल्पनेतून – जनसंवाद अभियान अंतर्गत केळवा सागरी पोलीस ठाणे ता. जि. पालघर व रोटरी क्लब केळवा, रोटरी क्लब ऑफ पालघर, इनर व्हील क्लब ऑफ पालघर, शितलादेवी व हनुमान मंदिर ट्रस्ट केळवा यांच्या संयुक्त विद्यमाने आणि कच्छ युवक संघ मेडिकल पालघर, व जे जे ब्लड बॕक यांच्या सौजन्याने दि. १५ ऑगस्ट २०२४ रोजी, शितलाई मंगलधाम हॉल केळवा ता. जि. पालघर येथे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे.

सदर शिबीर संदर्भात केळवा पोलीस ठाणे. प्रभारी पोलीस अधिकारी दत्ता शेळके सापोनी आणि कार्यरत पोलीस कर्मचारी यांनी, केळवा पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या विभागातील गावे – खेडे- पाडा येथील नागरिक यांना जनसंवाद अभियान यांच्या माध्यमातून जनजागृती करीत, रक्तदानांचे महत्त्व पटवून दिलेले. या अनुषंगाने रक्तदान शिबिरासाठी तरूण – तरूणी – महिला वर्ग शेकडोंच्या संख्येने उपस्थित होते. त्यातील प्रत्यक्ष ४४१ रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे.

    रक्तदान शिबिराला मा. बाळासाहेब पाटील – पो. अधिक्षक पालघर. मा. अभिजीत धाराशिवकर- उपविभागीय पो. अधिकारी पालघर, सफाळे पो. ठाणे प्रभारी पो. अधिकारी अविनाश मांदळे पो. निरीक्षक यांनी भेट देऊन रक्तदात्यांना प्रोत्साहन दिले. 

निलेश रमेश राऊत – शिवसेना वैद्यकीय कक्ष- पालघर जिल्हा प्रमुख, व पालघर जिल्हास्तरीय शांतता कमिटी सदस्य, तसेच मित्र फाऊंडेशन पालघरचे पदाधिकारी जेष्ठ पत्रकार मा.हिरालाल लोखंडे ,जगदीश पाटील माजी सरपंच कांद्रेभुरे, हरीश वझे पोलीस मित्र , सांबरे जी आदींनी उपस्थित रक्तदात्यांना प्रोत्साहन देत, त्यांचे आभार मानले.

रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी केळवा येथील तरूण तडफदार युवा वर्ग, मच्छिमार बांधव, केळवा सा. पो. ठाणे प्रभारी पो. अधिकारी श्री दत्ता शेळके सपोनि. पोलीस ठाण्यातील कार्यरत कर्मचारी, अंमलदार यांनी नियोजना करून रक्तदान शिबीर संपन्न केले आहे. याबद्दल परीसरातील नव्हे तर जिल्ह्यातून शिबीर आयोजक, सहकारी, रक्तदाते यांचे गोड कौतुक होत आहे.

आणखी खाली वाचा

तुम्हाला पैशाची गरज आहेत का मग कॉल करून लोणं घ्या एक कॉल तुमची तुमच्या आयुष्याची सुरवात चांगली करू शकते.

संपर्क.8668289497

 

शेअर करा.

मुख्य संपादक

टाइम्स 24 न्युज् हे एक सोशल मीडिया असून इथे बातम्या आणी चालू घडामोडी प्रतिनिधी कडून माहिती घेऊनच च्यानलं मध्ये प्रसारीत् केली जातात .जाहीरत् व बातमी साठी संपर्क.8830965218 मुख्य संपादक .राजेंद्र मेश्राम उप मुख्य संपादक.आशिष नागदेव

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!