विशेष वृतान्त

ध्येयापर्यंत पोहोचायचं असेल तर नम्र व्हा – राजन घरत       

वैभव पाटील

जीवनामध्ये उत्तुंग ध्येय गाठायचे असेल तर नम्र होणं ही आज काळाची गरज झाली “महापुरे झाडे जाती, तेथे लव्हाळी वाचती” . त्यासाठी आपण नम्र व्हायला शिकले पाहिजे .नम्रतेने उचित ध्येय साध्य करता येते.पालघर तालुका आगरी समाज संघ च्या वतीने इयत्ता दहावी व बारावी पपरीक्षेत चांगले गुण प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभ वेळी अध्यक्षीय भाषणात राजन घरत यांनी आपले मोलाचे विचार मांडले.व विद्यार्थ्यांना यशस्वी होण्यासाठी मूलमंत्र दिला .आपण कितीही मोठे झालात, तरी आपण या समाजाचा एक भाग आहोत .आपण आपल्या समाजाचे देणे लागतो.हे आपण कायमस्वरूपी लक्षात ठेवले पाहिजे. ” अश्वंम् नैवम् गजंम् नैवम् , वाघ्रमं नैवेची नैवम्, अजापुत्रं बलिदद्याती देवो दुर्बलमंं घातक: ” देव सुध्दा दुर्बलांचा वाली नसतो. म्हणून मित्रांनो बलवान व्हा.बौद्धिक दृष्ट्या बलवान व्हा. यावेळी समाजातील जवळजवळ 20 ते 25 गावातील शंभरहून अधिक विद्यार्थ्यांचा सन्मान होत असताना राजन घरत यांनी आपले मत व्यक्त केले. 7 जुलै 2024 रोजी राधाचंद्र हेरिटेज सफाळे( स्टेट बँकेच्या वरती ) येथे आगरी समाजातील इयत्ता दहावी मध्ये 80% च्या वरती व इयत्ता बारावी मध्ये 70% च्या वर गुण प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार आयोजित केला होता. याप्रसंगी विद्यावैभव विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक नरेश किणी यांनी मार्गदर्शनपर आपले मोलाचे विचार मांडले. आपल्या आई-वडिलांनी घेतलेल्या कष्टाचे चीज झाले आहे आणि त्यांच्याच प्रेरणेने तुम्ही मोठे होऊन हे यश प्राप्त केले आहे हे विसरून न जाता आपल्याला आई-वडिलांची सेवा ही महत्त्वाची आहे हे आपण लक्षात ठेवले पाहिजे . मायखोप गावचे माजी उपसरपंच दत्तात्रय भोईर यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करत आपल्या समाजासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे असे सांगितले आजचा हा कार्यक्रम फक्त समाजातील मुलांचा सन्मान करण्यासाठीच आहे त्यात कुठलेही पक्ष किंवा राजकारण नाही समाजकारणाचा वसा घेऊन आपण हे काम करूया असे सांगितले. विठ्ठलवाडी मांडे गावचे सरपंच व आगरी समाजासाठी तळमळीने काम करणारे महेंद्र पाटील यांनी आपले माैलिक विचार मांडताना विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी योग्य मार्ग निवडा .आणि जो मार्ग निवडाल त्यात सातत्य ठेवा प्रयत्नशील रहा. यश तुमचेच आहे. याच्या पासून तुम्हाला कोणी रोखू शकत नाही.कारण जीवनातले ही पहिली पायरी तुम्ही यशस्वीपणे पार पाडली आहे .आणि आपण नक्कीच यशस्वी व्हाल. यात मात्र शंका नाही . आगरवाडी गावचे शिक्षक राजन पाटील यांनी या सत्कार प्रसंगी आयोजकांना धन्यवाद देऊन असे सत्कार होणे आवश्यक आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये एक वेगळी प्रेरणा आणि ऊर्जा मिळते . असे सांगितले .माकणे विद्यालयाच्या प्रमुख शिक्षिका अलका घरत यांनीही या सत्कार प्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून पालघर तालुका आगरी समाज संघाचे कौतुक करत आभार मानले. कार्यक्रमाचे ऋण व्यक्त करण्यासाठी विद्यार्थ्यांमधून राजगुरू ह.म. पंडित विद्यालयामधून गुणवंत विद्यार्थी म्हणून रैानक घरत यांनी सांगितले कि हा सत्कार म्हणजे आम्हाला आमच्या घरातून मिळालेली शाबासकीची थाप आहे . आम्हा सर्व विद्यार्थ्यांकडून मंडळाला शुभेच्छा आहेत. हा सत्कार आम्ही कायम लक्षात ठेवून समाजासाठी नक्कीच भविष्यात काम करत राहू . असा शब्द दिला. पालघर तालुका आगरी समाज संघाचे प्रशस्तीपत्रक राजन घरत यांनी त्यांचा मुलगा (निखिल राजन घरत )याच्या स्मरणार्थ दिलेले सन्मानचिन्ह ,शॉल व गुलाब पुष्प असे सन्मानाचे स्वरूप होते .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन त्रिमूर्ती विद्यालय माकणे चे मुख्याध्यापक जगदीश किणी यांनी केले. यावेळी उमेश किणी, रमण पाटील, दीपक घरत, विनोद घरत, बाबुराव भोईर, बालेश कोटी, पुंडलिक घरत,सावंत रायसिग सर,रेखा घरत, जयु घरत ,जानव्ही पाटील ,कुसुम भोईर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

शेअर करा.

मुख्य संपादक

टाइम्स 24 न्युज् हे एक सोशल मीडिया असून इथे बातम्या आणी चालू घडामोडी प्रतिनिधी कडून माहिती घेऊनच च्यानलं मध्ये प्रसारीत् केली जातात .जाहीरत् व बातमी साठी संपर्क.8830965218 मुख्य संपादक .राजेंद्र मेश्राम उप मुख्य संपादक.आशिष नागदेव

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!