विशेष वृतान्त

सफाळा पोलीस ठाणे हद्दीतून वाहन चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगार सफाळा पोलिसांच्या जाळ्यात

वैभव पाटील :प्रतिनिधी

दि.17 जुलै : सफाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पारगाव येथून दि.15/07/2023 रोजी एका अज्ञात इसमाने फिर्यादीच्या मालकीची स्कुटी MH.MH.48.CG ही चहा पिऊन येतो असे खोटे सांगून सदर नं .ची स्कुटी लबाडीने मौजे पारगाव गाव देवी मंदिराच्या समोर असलेले ओम साई ऑटो सर्विस सेंटर समोरून पारगाव येथून चोरी करून पळून गेला म्हणून सफाळा पोलीस ठाणे येथे गु.र.नं .65 / 2023 भा. द. वि. सं .कलम 379 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन बाळासाहेब पाटील पोलीस अधीक्षक पालघर यांचेे आदेशान्वे नीता पाडवी उप विभागीय पोलीस अधिकारी पालघर विभाग यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि/ अमोल गवळी प्रभारी अधिकारी सफाळा पोलीस ठाणे यांनी पोलीस पथक तयार करून गुन्ह्याची गुन्हे करण्याची पद्धत तसेच सीसीटीव्ही फुटेज व इतर तांत्रिक व गोपनीय माहितीच्या मदतीने दि.17 जुलै 2023 रोजी आरोपी कमलेश रामानंद गुप्ता वय 33 वर्ष, रा. रूम नं 204, पियुष मेजेस्ट्रिक निर्मल नगर रोड दिवा(प), जि. ठाणे यास त्याचे राहते पत्त्यावर जाऊन रात्री सापळा रचून त्यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता आरोपी याने वरील नमूद स्कुटी घेऊन बोईसर येथे पादचारी महिलेच्या गळ्यातील १२ ग्राम वजनाची सोन्याची चैन जबरीने खेचून गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. सदर आरोपीला अटक करून त्याच्या विरुद्ध सफाळा पोलीस ठाणेे येथे गु.र.नं 65// 2023 भा. द. वि. सं .कलम 379 गुन्हा व बोईसर पोलीस ठाणे येथे गु.र.नं .284 / 2023 भा .द. वि. सं . अन्वये गुन्हा दाखल करून त्याच्याकडून सर्व मुद्देमाल हस्तगत केला आहे.सदर गुन्हाचा अधिक तपास हा सपोनि /अमोल गवळी, प्रभारी अधिकारी, सफाळा पोलीस ठाणे करीत आहे. सदर गुन्हेगाराची अधिक चौकशी केली असता त्याच्यावर अनेक गुन्हे दाखलअसल्याचे निदर्शनास आले आहे.
सदरची कामगिरी बाळासाहेब पोलीस, पोलीस अधीक्षक पालघर, पंकज शिरसाट अपर पोलीस अधीक्षक पालघर ,यांचे मार्गदर्शनाखाली श्रीमती नीता पाडवी, उपविभागीय पोलीस अधिकारी पालघर विभाग सपोनि/ अमोल गवळी प्रभारी अधिकारी सफाळा पोलीस ठाणे , पोउपनि/ मनीकेरी, बोईसर पोलीस ठाणे पोहवा/ 842 ए. व्ही. खोत, पोहवा /820 के.बी. शेळके, पोना / 22 व्ही. एन .सातपुते, पोहवा / 428 विजय दुबळा पोशि/ 84 मयुर पाटील, पोशि/280 धीरज साळुंखे, नेमणूक बोईसर पोस्ट याने उत्कृष्टरित्या पार पाडली आहे.

शेअर करा.

मुख्य संपादक

टाइम्स 24 न्युज् हे एक सोशल मीडिया असून इथे बातम्या आणी चालू घडामोडी प्रतिनिधी कडून माहिती घेऊनच च्यानलं मध्ये प्रसारीत् केली जातात .जाहीरत् व बातमी साठी संपर्क.8830965218 मुख्य संपादक .राजेंद्र मेश्राम उप मुख्य संपादक.आशिष नागदेव

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!